Monday, October 20, 2014

Wish U Happy Diwali

आनंदमय  दिवाळीच्या खूप खूप सुभेच्या 




प्रेम म्हणजे नक्की काय…

प्रेम म्हणजे नक्की काय…….


मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ?

मी त्याला सागितले की,

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.

पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम...






मी फक्त तुझ्यासाठी.....

मी फक्त तुझ्यासाठी.....

फक्त तुझ्यासाठी..... आयुष्य असेच सरले,
धावत आठवणींच्या पाठी सबंध आयुष्य वाट पहिली,
मी फक्त तुझ्यासाठी....
तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी ह्रुदयात दुःखाचे भास कवळले,
मी फक्त तुझ्यासाठी.....
जगले अशी की मी, जगणे राहून गेले पाठी डोळ्यातले अश्...रु ह्रुदयात कोंडले
मी फक्त तुझ्यासाठी.....
हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी त्या आशेवर जगत राहिले,
मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी याच हट्टावर आयुष्य बेतले,
मी फक्त तुझ्यासाठी.....
नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी त्या गाठीना सामभालुन, ठेवले
मी फक्त तुझ्यासाठी.....
एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटीत्या क्षणानना उराशी कवटाळले,
मी फक्त तुझ्यासाठी.....
अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी याच स्वप्नांना आयुष्य समजले,
मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटीभिन्न दिशांना झुरत राहिले,
मी फक्त तुझ्यासाठी.....


तुझ्यासाठी काही पण



तुझ्यासाठी काही पण
असे सारेच बोलतात
पण मी तसे बोलणार नाही
चंद्र तारे तोडून आणीन
अशी भाषा कधी
मी वापरणार नाही
इतकच म्हणेन मी
तुझ्या सुखाशिवाय मनात
काहीच असणार नाही
तुझ्या वेदना ओंजळीत घेईन
दुखातही तुझी साथ
कधी सोडणार नाही
प्रेमासाठी काही पण
हे तुला दाखवल्याशिवाय
मी रहाणार नाही
तुझ्यावर इतकं केलय प्रेम
कि माझ्यावरही कधी
इतकं प्रेम मी केलं नाही

Sunday, October 19, 2014

का रडतेस आता आणि कशासाठी ?

का रडतेस आता आणि
कशासाठी ?
कोणीतरी सांगितले रडलीस
फक्त माझ्यासाठी..
तेव्हा तर हसत हसत
मला दूर केले,
मग आता रडून दाखवून
तू काय सिध्द केले..
जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा,
मला तर एकट्यालाचं सोडले..
मात्र तुझ्या सोबतीला कोणीतरी होते,
म्हणून तू मागे वळून नाही पाहिले..
आता मला सवय लागली आहे
तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली आहेस
माझी परत येण्याची..
नको रडून मजबूर करूस मला परत
येण्यासाठी,
कारण
?
?
?
?
?
आता मी पुन्हा येणार नाही ते
दुःख सोसण्यासाठी.......

Monday, October 6, 2014

अचानक शाळेतला मित्र भेटला..


परवा अचानक शाळेतला,
जुना
मित्र  भेटला..
 
"ओळखलसं का मला?",
विचारलं त्याने हसुन...

वेळ असेल तुला तर,
बोलुया थोडं बसुन...

गाडी पाहताचं आनंदला,
हलवली
हळूच  मान...
"खुप मोठा झालासं रे,
पैसा कमावलासं छानं"

अजुनही भेटतात का रे,

रुपेश, राजू , प्रदीप ...?
टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...

डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?

टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...

धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...

तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...

"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."

मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...

शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...
परवा अचानक शाळेतला,
जुना
मित्र  भेटला...


दसरा

 दसरा....
या दिवशी म्हणे सोनं वाटतात...
एवढा मी श्रीमंत नाही....
पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
ईश्वराकडे माझी एकच प्रार्थना.....
'तुमच्या रूपाने असलेले माझे सोने सदैव उजळत राहो...'


Wednesday, October 1, 2014

संस्कृती पूर्वीची आणि आजची

भारतची   संस्कृती  ही  सर्व भागांमध्ये वेगळी पण वैशिष्ट्य पूर्ण आहे.  गणपती उत्सव , दशारा , दिवाळी , गुडीपाडवा नवरात्री उत्सव अश्या विविध उत्सवातून आपल्याला संस्कृती पाहायला मिळते . 

दिवाळी 
गणपती  उत्सव 

नवरात्री 


गुडीपाडवा
पण  आज बघितल  तर  आपल्याला संस्कृतीचा विसर पडला आहे .
 आपण हे उत्सव celibration समजून साजरा करतो.पूर्वीपासूनच  मेहंदी काढणे हि परंपरा आपल्याकडे आहे  
परंतु आजकाल आपल्याला अंगावर गोधवलेल   हेच बघायला मिळते . 


 आपल्या पोशाखात खूप बदल झालेत  आणि संस्कृती नावापुर्तीच राहिलेली आहे, यासर्वांचे परिणाम आपण बघतोच आहे.  स्त्रिया व  मुली  साडी आणि ड्रेस वापरतात, पण आजच्या जीन्स आणि टापच्या fashion मुळे अंगप्रदर्शन करून संस्कृती आणि लाज  संपूष्टातच  आणली आहे. 

 



ब्लॉग विषयी

 स्वप्नं आपण नेहमीच  बघतो, स्वप्नं  बघणे  आणि ते पूर्ण करणे सर्वांनाच जमत नाही .स्वप्नं  बघणे हा जणू माझा छंदच होता मी शाळेत असताना पासूनच  खूप स्वप्नं बघितली. अर्थातच माझी स्वप्ने हि माझ्या आजूबाजूला ज्या घडामोडी घडत होत्या त्या संदर्भाने होती, मी मोठा होत गेलो तशी माझी स्वप्ने हि बदली .
मी अनेक स्वप्ने बघितली पण सर्वच स्वप्नांमध्ये माझ्या कुटुंबासाठी जे मी  स्वप्नं बघितलं ते सर्वच स्वप्नामध्ये सारखच होत आणि आज पण मी जे स्वप्नं  बघतो त्यात  माझ्या कुटुंबासाठी जे मी  स्वप्नं बघितलं ते तेच आहे. मी बघितलेली स्वप्न कधी  पूर्ण होतील याचा  विचार केला नाही, आजपर्यंतच्या जीवनाचा  विचार केला तर  मी  खूप स्वप्नं बघितली आणि आज पण स्वप्नं बघतोपरंतु  आज जे स्वप्नं बघतो ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ते  पूर्ण होईलच. मी आजपर्यंतच्या जीवनात स्वप्नं  बरोबर घेऊनच जीवन जगलो, आणि त्यामुळे मला माझ्या ब्लोगच  नाव "  स्वप्नं सारथी " हे सुचल .